header

???????? ?????????? ??????????? ??????

 
C-DAC Logo
 

टीव्हीवर मनोरंजनासह मातृभाषेतून शिक्षण

Sakal
April 11, 2013

(Content in Marathi)

पुणे - संगीतविषयक अभ्यासक्रम असो किंवा "कौन बनेगा करोडपती' सारखी प्रश्‍नमंजूषा स्पर्धा... आता 80 विषयांचे शैक्षणिक अभ्यासक्रम तुमच्या मातृभाषेत आणि तेही मनोरंजनात्मक स्वरूपात टीव्हीवर (व्हर्चुअल युनिव्हर्सिटी) उपलब्ध होत आहेत. रिमोट कंट्रोल व इंटरऍक्‍टिव्ह सेट-टॉप बॉक्‍सच्याआधारे प्रेक्षकांना सहभागी करून घेत "टी-लर्निंग' या प्रणालीच्या माध्यमातून ही सुविधा "प्रगत संगणन विकास केंद्रा'तर्फे (सीडॅक) घरोघरी पोचविण्यात येत आहे.

टी लर्निंगसह "ऑटोमेटेड बायो-केमिस्ट्री ऍनलायझर' आणि "एन्टरप्राईज वाइड सेल्फ मॅनेज्ड नेटवर्क सोल्यूशन' (एज) ही दोन उत्पादनेही संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त बाजारात सादर करण्यात आली आहेत, अशी माहिती संस्थेचे महासंचालक प्रा. रजत मुना व कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

टी-लर्निंग प्रणालीमुळे संपूर्ण मराठी विश्‍वकोश टीव्हीवरून ऍक्‍सेस करता येणार आहे. त्याचे काम काही महिन्यांतच पूर्ण होईल. त्याचबरोबर मराठी व ऊर्दूसह 22 भारतीय भाषा आणि 80 विषयांवरील माहिती (कन्टेंट) विविध यंत्रणांद्वारा तयार करण्यात येत आहे. ही प्रणाली वापरण्यासाठी ग्राहकांना फक्त इंटरऍक्‍टिव्ह सेट टॉप बॉक्‍सची गरज भासेल,'' असे ग्राफिक्‍स अँड इंटेलिजन्स बेस्ड स्क्रिप्ट टेक्‍नॉलॉजी (जीस्ट) विभागाचे प्रमुख महेश कुलकर्णी यांनी सांगितले.

डिजिटायझेशनच्��ा काळात सेट टॉप बॉक्‍सच्या आधारे विविध उपक्रम राबविता येतील. एटीएम, क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर कसा करावा किंवा करू नये याबाबत गृहिणींना मातृभाषेतून माहिती देता येऊ शकते. तसेच शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारी उत्पादने, त्याच्या नजीकच्या परिसरातील किमती व उपलब्धता याची माहिती स्थानिक भाषेत टीव्हीवर उपलब्ध होऊ शकते. अंध किंवा विशेष व्यक्तींसाठी "ऍनिमेटेड अवतार'च्या माध्यमातून माहिती देता येईल,'' असेही मुना व कुलकर्णी यांनी सांगितले.

रक्ततपासणी काही सेकंदांत ""सीडॅकने तयार केलेल्या ऑटोमॅटिक बायोकेमिस्ट्री ऍनलायझर यंत्रामुळे विविध प्रकारांपैकी 80 टक्के रक्ततपासण्या स्वस्त होणार असून, त्या काही सेकंदांत पूर्ण करता येणार आहेत. अशा तपासण्यांसाठी सध्या मोठ्या रुग्णालयांसह विविध वैद्यकीय संस्थांमध्ये इम्पोर्टेड यंत्र वापरण्यात येते. त्याची किंमत 15 लाखांच्या पुढे आहे. मात्र सीडॅकने तयार केलेल्या स्वदेशी यंत्राची किंमत अत्यंत कमी आहे. त्यामुळे तपासण्यांच्या किमती साधारण तीस टक्‍क्‍यांनी कमी होतील,'' असा विश्‍वास प्रा. रजत मुना यांनी व्यक्त केला.