header

?????' ?????????? ??????? ?????? ?????

 
C-DAC Logo
 

सीडॅक' भाषांतराची प्रणाली विकसित करणार

Sakal
September 26, 2012

(Content in Marathi)

पर्यटन आणि आरोग्य क्षेत्रात संभाषणामध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स्ड कंप्युटिंगतर्फे (सीडॅक) "व्हाइस रेकग्निशन ट्रान्सलेशन' ही भाषांतराची संगणक प्रणाली विकसित केली जाणार आहे. त्यामुळे आता इतर भाषांतील लोकांशीही मातृभाषेतून संवाद साधता येणार असल्याचे "सीडॅक'चे कार्यकारी संचालक हेमंत दरबारी यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात हिंदी, मराठी, पंजाबी, बंगाली आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये ही प्रणाली विकसित होणार असून, या वर्षाअखेरीस त्याचे "बिटा व्हर्जन' उपलब्ध होणार आहे. सध्या विंडोज आधारित मोबाईलवर ही प्रणाली कार्यान्वित होत आहे. कालांतराने ही प्रणाली सर्वच मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. यापूर्वी सीडॅकने दृष्टिहीनांसाठी "श्रुतिदृष्टी' आणि "श्रुतिलेखन' ही दोन अप्लिकेशन यशस्वीपणे विकसित केली आहेत. "व्हाइस रेकग्निशन ट्रान्सलेशन' त्याचेच विस्तारित रूप असून, क्‍लाऊड प्रणालीवर आधारित आहे.

पर्यटनासाठी तुम्ही जाणाऱ्या ठिकाणची भाषा तुम्हाला समजत नसेल, तर या प्रणालीचा निश्‍���ितपणे फायदा होणार आहे. यात तुम्हाला तुमच्या मातृभाषेतच बोलायचे आहे. ऍपद्वारे तुमचा प्रश्‍न इंग्रजीत भाषांतरित होईल. त्यानंतर समोरच्या व्यक्तीला समजणाऱ्या भाषेत तो अनुवादित होईल. त्या प्रश्‍नाचे उत्तर समोरची व्यक्ती त्याच्या मातृभाषेत देईल. ते उत्तर पुन्हा अनुवादित होऊन तुमच्या मातृभाषेत ऐकायला मिळेल. समोरासमोर बोलत असल्यास कोणाच्याही एकाच्या मोबाईलवर ऍप असायला हवे. मात्र एकमेकांपासून दूर असल्यास दोघांकडेही ऍप असणे आवश्‍यक आहे.

"एचटीएमएल5"

शासनाच्या सुविधांची माहिती नागरिकांना सहजपणे मिळण्यासाठी संकेतस्थळांचा वापर वाढत आहे. व्हिडिओ व ऍनिमेशन, ग्राफिक्‍स, शैली, टाईपोग्राफी, तसेच डिजिटल प्रकाशनांतील इतर यंत्रणांसाठी "डब्ल्यू3सी' आणि "एचटीएमएल5' फायदेशीर ठरणार आहे. मोबाईल व संबंधित उपकरणांमध्ये ई-प्रणालीची क्षमता वाढविण्यासाठी "एचटीएमएल5'चा उपयोग होणार आहे. या प्रकल्पाचे प्रमुख माईकल स्मिथ आणि जागतिक व्यापार विकास सल्लागार जे. एलन वर्ड यांनी "एचटीएमएल5'बाबतची माहिती दिली.