header

????? ????????? ???????????? '???'

 
C-DAC Logo
 

संगणक प्रणालीचा आचारसंहितेवर 'वॉच'

Lokmat
March 30, 2014

(Content in Marathi)

राजकीय पक्षांकडून आचारसंहितेचा भंग होत नाही ना याकडे निवडणूक आयोग बारीक लक्ष ठेवून असतो त्यांच्या मदतीकरिता सी-डॅकच्या वतीने एक नवीन संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्याच्या मदतीने आचारसंहिता भंगाच्या प्रकारांवर लक्ष ठेवणे निवडणूक आयोगास सोपे जाणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मध्य प्रदेश राज्यात या प्रणालीचा उपयोग करून त्याचा प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती सी-डॅकचे संचालक प्रा. रजत मुना यांनी दिली.

रविवारी (३0 मार्च) सी-डॅकचा २७ वा वर्धापन दिन आहत्न त्यानिमित्तने ३0 ते ३१ मार्च दरम्यान पुणे विद्यापीठात सी-डॅकच्या प्रगत तंत्नज्ञानाचे सादरीकरण, चर्चा, प्रदशर्नाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम विद्यार्र्थी व सवर्सामान्यांसाठी खुला राहणार आहे असे मुना यांनी सांगितले. यावेळी कायर्कारी संचालक हेमंत दरबारीसह अन्य अधिकारी उपस्थित होते.

राजकीय पक्र्षंकडून आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे का याची तपासणी सी-डॅकच्या संगणक प्रणालीव्दारे केली जाईल, त्यानंतर त्याबाबत निवडणूक कार्यालयास कळविले जाईल. निवडणूक कार्यालयाकडून त्याची खातरजमा केली जाईल व अंतिम निर्णय निवडणूक अधिकार्‍यांकडून घेतला जाईल, असे मुना यांनी सांगितले. ही संगणकप्रणाली यापूर्वी गुजरात आणि मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आली होती. यंदा प्रथमच लोकसभा निवडणुकीत ती वापरण्यात येणार असून, प्रथमत: प्रायोगिक तत्त्व���वर मध्यप्रदेशात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विविध भाषांमध्ये की-बोर्��

सी-डॅकने अँड्रॉइड मोबाईलवर भारतीय भाषांचे की-बोडर्ची प्रणाली विकसित केली आहे. हिंदी, गुजराती, कानडी, तेलगू, मल्याळम, ओरिसा, पंजाबी, बंगाली, आसामी, तामिळी भाषांमध्ये की-बोर्ड आहे. ही प्रणाली डाऊनलोड केल्यास त्या भाषेत टाईप करून तुम्हाला मोबाईलवरून संदेश पाठविण्याची सुविधा आहे. त्यामुळे मोबाईलवरून मराठी भाषेतही सहज टाईपिंग करता येणे शक्य आहे.