‘????? ?? ???????’ ????????? ??????

 
C-DAC Logo
 

‘स्पीच टू टेक्स्ट’ सॉफ्टवेअर विकसित

Maharashtra Times
September 26, 2012

(Content in Marathi)

पश्चिम बंगालमध्ये फिरायला जाण्याचा बेत आखताय...तेथे फिरताना भाषेची अडचण येण्याची काळजी वाटते आहे... पर्यटकांना येणाऱ्या या अडचणी लक्षात घेऊन ' स्पीच टू टेक्स्ट ' भाषांतर करू शकणारे सॉफ्टवेअर विकसित करण्याचा उपक्रम सेंटर फॉर डेव्हलमेंट ऑफ अॅडव्हान्स कम्प्युटिंगने (सी-डॅक) हाती घेतला आहे. याच धर्तीवर आरोग्य क्षेत्राला आवश्यक असणारे सॉफ्टवेअरही विकसित करण्यास सुरुवात झाली आहे.

' स्पीच टू टेक्स्ट ' हा उपक्रम ' सी-डॅक ' चे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आला आहे. या सॉफ्टवेअरच्या सुरुवातीच्या हिंदीमधील घेण्यात आलेल्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे बंगला , मल्याळम , पंजाबी , मराठीसह पाच भारतीय भाषांमध्ये ते उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. ' स्पीच टू टेक्स्ट ' अंतर्गत बोलणे हे रेकग्नाइज केले जाते , आणि त्यानंतर ते संबंधित भाषेत टेक्स्ट होते. हे सॉफ्टवेअर क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्याचप्रमाणे हे सॉफ्टवेअर मोबाइलवर उपलब्ध करून देण्यासाठी त्यासाठीचे अॅप्लिकेशनही उपलब्ध केले जाईल. यासाठी एक वर्षाचा कालावधी लागू शकतो , असे दरबारी यांनी सांगितले. या सॉफ्टवेअरमुळे पर्यटकांना स्थानिक पातळीवर फिरताना भाषेची येणारी अडचण दूर होण्यास मदत होईल.

पर्यटनाबरोबर आरोग्य क्षेत्रासाठीही असे सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम सुरू आहे. तेही वर्षभरात उपलब्ध होऊ शकेल. याचा फायदा डॉक्टरांना होऊ शकेल. व्हॉइसवर आधारित चॅट रेकग्निशन सुविधाही उपलब्ध करून देण्याची चाचपणी सुरू आहे. ही सॉफ्टवेअर ' वापरानुसार पैसे ' या तत्त्वावर उपलब्ध होऊ शकतात , असे दरबारी यांनी नमूद केले.

' श्रृत लेखन ' विकसित

' सी-डॅक ' ने विकसित केलेल्या श्रृत लेखन सॉफ्टवेअरमुळे बोललेले वाक्य थेट कम्प्युटिंग उपकरणावर लिहिणे शक्य झाले आहे. सध्या हे सॉफ्वटेअर हिंदी भाषेपुरते मर्यादित आहे. प्रत्येक भागात भाषेचा उच्चार आणि बोली वेगळी असल्याने मोठे आव्हान असल्याचे दरबारी यांनी सांगितले. मात्र , प्रमाण भाषेमध्ये श्रृत लेखनचा यशस्विता सरासरी ८० ते ८५ टक्के आहे. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर हे सॉफ्टवेअर चालू शकते. मोबाइलवर असे सॉफ्टवेअर उपलब्ध होऊ शकते का , याचा विचार सुरू आहे.

सी-डॅकतर्फे जनजागृती परिषद

' सी- डॅक ' ने डब्ल्यू- 3- सी , एचटीएमएल-५ जनजागृतीकरिता एका परिषदेचे आयोजन केले होते. वर्ल्ड वाइड वेब कंन्सोर्शियम (डब्ल्यू-३-सी) ओपन वेब माध्यमांशी संलग्न असणारा यंत्रणांना डेटा पोहचविण्यास मदत करते. एचटीएमएल-५ वेब माध्यामांचा प्रसार करते. ओपन वेब प्लॅटफार्मच्या उद्देशापर्यंत पोहचण्याकरिता एचटीएमएल-५ , डब्ल्यू-३-सीने विकसित केली आहे. या उपकरणांमार्फत व्हीडिओ व अॅनिमेशन , ग्राफिक्स , शैली , टाइपोग्राफी , क्रॉस-प्लॅटफार्मसाठी प्रोग्रॅमिंग उपलब्ध करून देते. सर्व प्लॅटफॉर्मवर एकाच अॅप्लिकेशन उपलब्ध करून देण्यासाठी कोअर मोबाइल प्लॅटफॉर्म उपयोगाचा आहे. त्याचा प्रसार करणे हा प्रमुख हेतू असल्याचे डब्ल्यू-३-सीचे डेव्हलपमेंट प्रमुख जे. अॅलन बर्ड यांनी सांगितले.

अंधासाठी ' श्रृती दृष्टी '

अंधांसाठी श्रृती दृष्टी हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. देशातील अंधांच्या दोनशे शाळांमध्ये ते बसविण्यात आले आहे. यामुळे अंध व्यक्ती इंटरनेट ब्राउझिंग करू शकते.

Top