सी-डॅकच्या महासंचालकपदी ईथिराजन

Sakal
April 8, 2022

सी-डॅकच्या महासंचालकपदी ईथिराजन

प्रगत विकास संगणन संस्थेच्या (सी-डॅक) महासंचालकपदी मंगेश ईथिराजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते महासंचालक कर्नल ए.के.नाथ (निवृत्त) यांच्याकडून त्यांनी बुधवारी (ता.६) कार्यभार स्वीकारला. केंद्रसरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ही नियुक्ती घोषित केली होती.

ईथिराजन यांना इलेक्ट्रॉनिक्स, चीप डिझाईन, हार्डवेअर, आयपी आदी क्षेत्रातील संशोधन आणि विकासकामांचा २९ वर्षांचा अनुभव आहे. राष्ट्रीय सुपरकंप्युटींग मिशन आणि भारत सेमिकंडक्टर मिशनमध्ये त्याच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. मायक्रोप्रोसेसर मिशन अंतर्गत त्यांच्या नेतृत्वात सी-डॅकने तेजस-३२ बीट नावाच्या मायक्रोप्रोसेसरवर आधारित आयओटी-एसओसी निर्माण केला आहे. या आधी ते तिरूअनंतपुरम येथील प्रयोगशाळेचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत होते.