??????? ??????????? ????? ????????? ?????'

 
C-DAC Logo
 

'स्मार्ट कार्डद्वारे उपचार योजनेबाबत विचार'

(Content in Marathi)

Sakal
February 21, 2013

प्रत्येकाच्या जनुकीय संरचनेच्या (जीनोम स्ट्रक्‍चर) आधारे स्मार्ट कार्ड तयार करून त्याआधारे त्या त्या व्यक्तीवर औषधोपचार करण्याच्या योजनेवर विचार सुरू आहे. 2020 मध्ये ही योजना प्रत्यक्षात येऊ शकते, अशी माहिती सी-डॅकचे सहसंचालक पी. के. सिन्हा यांनी बुधवारी दिली.

सी-डॅकने आयोजित केलेल्या प्रवेगित जीवशास्त्र (ऍक्‍सलरेटिंग बॉयोलॉजी-2012) या विषयावरील तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. संकल्पनेबाबत ते म्हणाले, ""डॉक्‍टर केवळ आजाराची लक्षणे पाहून औषधे सुचवितात. मात्र, प्रत्येक व्यक्तीची जनुकीय संरचना ही वेगवेगळी असल्याने ही औषधे काही जणांना लागू पडत नाहीत. उलट दुष्परिणामही होतात. मात्र, जनुकीय संरचना असलेले स्मार्ट कार्ड तयार असल्यास डॉक्‍टर त्याआधारे औषधे सुचवू शकतील. ती जास्त परिणामकारक सिद्ध होतील. अमेरिकेत अशा प्रकारचे स्मार्ट कार्ड तयार करण्यात आले आहे. पण, त्याची किंमत एक हजार डॉलर म्ह��जे सुमारे पंचावन्न हजार रुपये इतकी आहे. हा खर्च आपल्या देशातील नागरिकांसाठी खूपच जास्त आहे.''

Top