..??? ????????? '?????????'!

 
C-DAC Logo
 

..आता मराठीसाठी 'यशोमुद्रा'!

Lokmat
March 09, 2013

(Content in Marathi)

शासनाची विविध संकेतस्थळे पाहताना, शासन निर्णय वाचताना फॉन्ट न दिसण्याच्या असंख्य अडचणी येतात. त्या आता दूर होणार आहेत; कारण राजभाषा मराठीसाठी राज्य शासनाचा स्वत:चा फॉन्ट तयार करण्यात आला आहे. त्याचे नाव 'यशोमुद्रा'!

संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीची संधी साधत या फॉन्टचे नाव त्यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. हा फॉन्ट शासनाच्या सर्व ई-गव्हर्नन्स, शासकीय प्रकाशनांमध्ये वापरण्यात येणार आहे. सीडॅकने या फॉन्टची निर्मिती केली आहे. काम अंतिम टप्प्यात असून, येत्या १ मेला महाराष्ट्र दिनी हा 'यशोमुद्रा' फॉन्ट प्रकाशित केला जाईल, असे नियोजन सुरू आहे.

शासनाच्या विविध विभागांची अनेक संकेतस्थळे आहेत. त्यांवर दररोज फॉन्टच्या हजारो अडचणी येत असतात. ते कमी करण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेकडून प्रयत्न केले जात होते. राज्य शासनाच्या सर्व संकेतस्थळांवर आणि ऑनलाइन प्रकाशनांसाठी एकच मराठी फॉन्ट असावा, हा विचार त्यांनी सीडॅकला सांगितला. त्यानुसार गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात या फॉन्टच्या निर्मितीसाठी सीडॅकने संशोधन सुरू केले. वर्षभरातील अथक परिo्रमानंतर त्यांनी वेबसाठीचा स्टॅन्डराइज फॉन्ट विकसित केला आहे, जो 'फ्री अँड ओपन सोर्स'मध्ये असणार आहे.

२00९ मध्ये राज्य शासनाने अध्यादेश काढून शासनाच्या सर्व कामकाजात एकच लिपी वापरण्यात यावी, असे सरकारने सांगितले होते.

मात्र प्रत्यक्षात सर्वांसाठी अशी एकही लिपी अस्तित्वात नव्हती. त्यामुळे सर्वसमावेशक मराठी फॉन्ट तयार केला आहे. गरजा शोधणार्‍या समितीने केलेल्या शिफारशींनुसार नवा फॉन्ट तयार करताना करण्यात आला आहे. असे आहेत बदल...

Top