?????????? ???? ??????????? ??????

 
C-DAC Logo
 

टीव्हीसमोर बसून मातृभाषेतून अभ्यास

Maharashtra Times
April 11, 2013

(Content in Marathi)

देशभरातील विद्यार्थ्यांना आता टीव्हीवरून घरबसल्या विविध विषयांचा अभ्यास करता येणार आहे , ते ही आपल्या मातृभाषेतून. ' सेंटर फॉर अॅडव्हान्स कम्प्युटिंग ' अर्थात ' सी-डॅक ' च्या ' टी-लर्निंग सूट ' या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ही संधी मिळणार आहे. सध्या विविध ८० विषयांची माहिती यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

' सी-डॅक ' चे महासंचालक प्रा. रजत मूना यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ' सी-डॅक ' च्या पुणे विभागाचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी , संचालक आर. वाय देशपांडे , सहसंचालक महेश कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते. आज , गुरुवारी सी-डॅकच्या २६ व्या स्थापनादिनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते हे तंत्रज्ञान सादर करण्यात
येणार आहे.

मूना म्हणाले , ' टी-लर्निंग ' च्या माध्यमातून दूर शिक्षण क्षेत्रातील कंपन्यांना ' इंटरअॅक्टिव्ह ' माध्यम उपलब्ध होणार आहे. तसेच , प्रेक्षकांनाही प्रश्नमंजूषा , नोट्स तसेच संदर्भ साहित्याचाही वापर करता येईल , अशी सुविधा असलेले हे तंत्रज्ञान भारत सरकारने अधिसूचित केलेल्या २२ भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यामुळे देशातील कुठल्याही भागातील व्यक्तीला त्याच्या आवडीनुसार व गरजेनुसार हव्या त्या विषयाचे ज्ञान आपल्या मातृभाषेत घेता येणार आहे. ' व्हर्च्युअल विद्यापीठा ' च्या धर्तीवर या तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यात आली आहे. '

दर���्यान , मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे सहसंचालक प्रा. एम. बालकृष्णन , डीआरडीओमधील अग्नी -पाच या क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या संचालक डॉ. टेसी थॉमस आदी उपस्थित राहणार आहेत.

Top