?????????? ?????????????? ????????- ???????????

 
C-DAC Logo
 

सवलतींसाठी प्राध्यापकांचा बहिष्कार- मुख्यमंत्री

Sakal
April 12, 2013

(Content in Marathi)

"गुणात्मक सुधारणांऐवजी सवलतींसाठी प्राध्यापक परीक्षेवर बहिष्कार घालून सरकारशी संघर्ष करीत आहेत. संशोधन व शिक्षणाबाबत आपली मनोवृत्ती अशी असेल, तर देश महासत्ता होण्याची येत्या काळातील संधीही गमावून बसू," असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.

प्रगत संगणन विकास केंद्राच्या (सीडॅक) 26 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. याप्रसंगी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी विकास देशमुख, सीडॅकचे महासंचालक प्रा. रजत मूना, कार्यकारी संचालक हेमंत दरबारी, अग्नी क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या संचालिका डॉ. टेस्सी थॉमस, भारतीय माहिती-तंत्रज्ञान उद्योगाचे जनक फकीरचंद कोहली, बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे सहायक संचालक प्रा. एन. बालकृष्णन उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, "शिक्षणाच्या गुणवत्तेपेक्षा आपण संख्येवर भर दिला. राज्यातील परिस्थिती पाहिली तर विद्यार्थ्यांमध्ये गणिती कौशल्याचा विकास होताना दिसत नाही. संशोधनात आपल्याला रस नाही. नेट-सेट परीक्षेसह काही निकषांच्या आधारे गुणात्मक सुधारणा करण्याऐवजी सवलतींसाठी शिक्षक संघटित झाले आहेत आणि ते सरकारशी संघर्ष करीत आहेत. संशोधनाबाबत आपली वृत्ती अशी असल्यास देश महासत्ता होण्याची येत्या काळातील संधी गमावण्याचीच चिन्हे आहेत."

"माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोन्ही उद्योगांमध्ये समतोल साधला गेला पाहिजे. त्यासाठी "फॅब्रिकेशन इंडस्ट्री'वर भर दिला पाहिजे. तसेच "सीडॅक'सारख्या "सेंटर ऑफ एक्‍सलन्स'ला योग्य व्यवस्थापन, ध्येयनिश्‍चिती आणि सरकारी यंत्रणांचा पाठिंब्याची गरज आहे. समाजावर प्रचंड सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी हे प्रयत्न केले पाहिजेत," असेही चव्हाण यांनी सांगितले. कोहली, थॉमस, मूना यांनी मनोगत व्यक्त केले. दरबारी यांनी प्रास्ताविक केले.

Top