‘???????????’?????? ?????? ???????????? ????????

 
C-DAC Logo
 

‘टेलिमेडिसिन’द्वारे वाढणार आरोग्यसेवेची व्याप्ती

Maharashatra Times
September 02, 2012

(Content in Marathi)

बाराव्या पंचवार्षिक योजनेत देशात टेलिमेडिसीनची यंत्रणेसाठी ठराविक निधीची तरतूद करण्यात आली असून त्याद्वारे जिल्हा हॉस्पिटल ते गावपातळीवरील आरोग्य केंद्रांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचणे शक्य होणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या टेलिमेडिसीन आणि प्रशिक्षण विभागाचे उपायुक्त डॉ. नवनीतकुमार धामेजा यांनी ही माहिती दिली. सी-डॅकच्या टेलिमेडिसिन सोसायटी ऑफ इंडियाच्या (टीएसआय) महाराष्ट्र शाखेच्या पहिल्या ' महाटेलीमेडिकॉन ' या परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी सी डॅकच्या मर्क्युरी निंबस या सॉफ्टवेअरची घोषणा करण्यात आली. त्यावेळी टीएसआयचे अध्यक्ष डॉ. सरोज मिश्रा , सचिव डॉ. बी. एन. मोहंती , उपाध्यक्ष डॉ. बी.एस. रट्टा , इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. भारती ढोरे पाटील , डॉ. वैजयंती पटवर्धन यावेळी उपस्थित होते.

ठळक नोंदी

महाराष्ट्रात सहा ठिकाणी टेलिमेडिसिनची केंद्रे कार्यरत आहेत.

टेलिमेडिसिन हे आरोग्यसेवेचे भविष्य आहे.

टेलिमेडिसिनसाठी ई हेल्थ ही संकल्पनाच कार्यरत करण्यात येत आहे.

खासगी हॉस्पिटलमध्ये वैद्यकतज्ज्ञांनीही टेलिमेडिसिनचा आधार घेण्यासाठी सज्ज होण्याची गरज

Top