accessibilty toolbox
color contrast
text size
highlighting content
zoom in

???????????? ???????? ‘??-???’?? ????

 
C-DAC Logo
 

व्यक्तिनुरूप औषधासाठी ‘सी-डॅक’चे पाऊल

Maharashtra Times
February 18, 2014

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कम्प्युटिंगतर्फे (सी-डॅक) खास बायोइन्फोर्मेटिक्स'साठी स्वतंत्र अशा 'परम बायोब्लेझ' या सुपर कम्प्युटिंग क्लस्टरची निर्मिती करण्यात आली आहे. जैवमाहितीशास्त्राच्या (बायोइन्फोर्मेटिक्स) माध्यमातून जमा होणारा प्रचंड मोठा माहितीसाठा साठविण्यासाठी; तसेच त्यावर विविध प्रकारच्या प्रक्रिया करण्यासाठी या क्लस्टरचा वापर करता येणार आहे.

'सी-डॅक'च्या पुणे केंद्राचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी आणि बायोइन्फोर्मेटिक्स विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र जोशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या क्लस्टरचे उद‍्घाटन आज (मंगळवारी) होणार आहे. देश विदेशातील विविध संशोधन संस्थांसाठी 'सी डॅक' राबवित असलेल्या प्रकल्पांसाठी त्याचा वापर होणार आहे.

'बायोलॉजीच्या क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बायोइन्फोर्मेटिक्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर माहिती निर्माण होत आहे. त्यातून विविध आजारांवर उपाय शोधणे देखील शक्य होणार आहे. परंतु, ही माहिती साठवणे आणि त्याचे पृथ्थकरण करणे हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे. त्यासाठी अशा प्रकारच्या विशिष्ट क्लस्टरची उभारणी करण्यात आली आहे,' असे डॉ. जोशी यांनी सांगितले.

'परम बायोब्लेझ' अत्यंत वेगवान असून ५६ गिगाबाइट्स प्रति सेकंद या गतीने तो कार्य करतो. औषधांसाठी संशोधन करण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालते. त्यासाठी क���्प्युटरवर सिम्युलेशनच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या चाचण्यांसाठी याचा वापर होऊ शकतो. त्याचबरोबर जिनॉमिक्समध्ये जिनोम सिक्वेन्सिंग करताना कम्प्युटरला मोठ्या प्रमाणात मेमरी असणे आवश्यक असते. त्यासाठी 'परम बायोब्लेझ' मध्ये दोन टेराबाइट्सची मेमरी निर्माण करण्यात आली आहे. या पूर्वी या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रणेची मेमरी एक टेराबाइट इतकी होती,' असे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.

जैवमाहितीशास्त्रावर आजपासून चर्चासत्र

बायोइन्फोर्मेटिक्समधील विविध प्रवाहांवर चर्चा करण्यासाठी सेंटर फॉर अॅडव्हान्स कम्प्युटिंग अर्थात 'सी-डॅक' तर्फे आजपासून (मंगळवार) तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. बायोलॉजी आणि बायोइन्फॉर्मेटिक्स क्षेत्रात काम करणाऱ्या देश-विदेशातील दिग्गज व्यक्ती या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत.

बाणेर येथील यशवंतराव चव्हाण प्रशासन विकास प्रबोधिनी अर्थात यशदाच्या सभागृहात हे चर्चासत्र होणार आहे. चर्चासत्राचे उद‍्घाटन सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबादचे कुलगुरू डॉ. रामकृष्णा रामास्वामी यांच्या हस्ते आणि केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे समूह समन्वयक डॉ. व्ही. जी. व्ही. रामराजू यांच्या उपस्थितीत होणार आहे.

'सी-डॅक'च्या 'बायोइन्फोर्मेटिक्स रिसोर्सेस अँड अॅप्लिकेशन फॅसिलिटी' (बीआरएएफ) केंद्राच्या दशकपूर्तीनिमित्त या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. 'बायोलॉजीत बायोइन्फोर्मेटिक्सचा वापर वाढल्याने मोठ्या प्रमाणावर माहिती जमा होत आहे. बायोइन्फोर्मेटिक्समध्येही मागील काही वर्षात खूप मोठे बदल झाले आहेत. या माहितीची योग्य साठवणूक करून त्यावर प्रक्रिया करणे आव्हानात्मक बनत चालले आहे. त्यासाठी सुपर कम्प्युटिंगच्या माध्यमातून 'सी-डॅक' त्यावर उपाययोजना करत आहे. बायोइन्फोर्मेटिक्सच्या विविध पैलूंवर तसेच भविष्यातील आव्हानांवर या चर्चासत्रात चर्चा होणार आहे,' असे 'सी-डॅक' च्या पुणे केंद्राचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी ���ांनी सांगितले.

'बायोइन्फोर्मेटिक्सच्या माध्यमातून 'परम बायोब्लेझ' सारख्या यंत्रणांद्वारे एखाद्या व्यक्तीसाठी त्याच्या प्रकृतीनुसार खास 'पर्सन्लाईज्ड' औषधेही विकसित करता येऊ शकतात. व्यक्तीनुरूप औषध विकसित केल्याने औषधाचे दुष्परिणाम टाळणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर दीर्घकाळ चालणारी संशोधन अधिक जलदगतीने पार पडू शकेल,'

डॉ. हेमंत दरबारी, कार्यकारी संचालक, 'सी-डॅक', पुणे

Top