C-DAC: Press Kit - In the News

 
C-DAC Logo
 

विश्‍वकोश अभ्यासा आता ऑनलाइन

Sakal
November 16, 2011

(Content in Marathi)

मराठी भाषेतील ऐतिहासिक वैभव जपलेले विश्‍वकोश आता नागरिकांना, विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरही अभ्यासण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. पहिला खंड नुकताच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यापुढे दर महिन्याला एक खंड संकेतस्थळावर समाविष्ट होणार आहे.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी संपादित केलेल्या विश्‍वकोशाचे जतन करून सर्वसामान्यांपर्यंत ते पोचविण्यासाठी विश्‍वकोश निर्मिती मंडळाने "सी-डॅक'च्या सहकार्याने हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारने आर्थिक मदत केली आहे. http://www.marathivishwakosh.in/ या संकेतस्थळावर ते अभ्यासण्यासाठी मिळणार आहेत. त्यासाठी कोणताही फॉन्ट डाऊनलोड करण्याची गरज नसून, युनिकोडमध्ये ते उपलब्ध असतील. 25 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिला खंड संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. पहिल्या खंडाची सुमारे एक हजार वेबपेजेस संकेतस्थळावर समाविष्ट आहेत. 18 खंडांची सुमारे वीस हजार वेबपेजेस असतील, अशी माहिती "सी-डॅक'मधील सहयोगी संचालक व "जीस्ट'चे विभागप्रमुख महेश कुलकर्णी यांनी दिली. विश्‍वकोशाच्या खंडांत 1997 पर्यंतच्या नोंदींचा समावेश आहे. विश्‍वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड यांनी विश्‍वक���शाचे कामकाज सातत्याने सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार संकेतस्थळावर सुधारणा होतील, असे कुलकर्णी यांनी नमूद केले. या पूर्वीच्या संकेतस्थळावर खंडांतील माहितीची स्कॅन पाने होती. आता माहितीत सुधारणा करून तिचा समावेश संकेतस्थळावर करण्यात आला आहे. त्यामुळे विशिष्ट माहितीचा शोध घेणे, हव्या असलेल्या व्यक्तींना पाठविणे, जतन करून ठेवणे शक्‍य होणार आहे. सी-डॅकमधील सुमारे 30 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गट या प्रकल्पावर सध्या काम करीत आहे, असे त्यांनी नमूद केले. राज्य सरकारच्या संकेतस्थळावरही हे संकेतस्थळ "लिंक' करण्यात येणार आहे. समानार्थी शब्द ऑनलाइन मिळणे, अर्थाचे स्पष्टीकरण आदी सुविधा त्यात उपलब्ध होतील, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

Top