"?????????' ?????? ???? ??-???????!

 
C-DAC Logo
 

"विश्‍वकोश' मोबाईल अन्‌ आय-पॅडवरही!

Sakal
December 02, 2011

(Content in Marathi)

हवा त्या वेळी विश्‍वकोश पाहता यावा, त्यातील माहिती सर्व क्षेत्रांतील लोकांना समजावी, यासाठी तो संकेतस्थळावर आणला जात आहे. येत्या काही दिवसांत मोबाईल आणि "आय-पॅड'वरही विश्‍वकोश उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळाने पावले उचलली आहेत. तसेच, राज्यातील कर्तबगार स्त्रियांच्या कार्यावर आधारित "महाराष्ट्र कन्याकोश' तयार करण्याचा निर्णयही मंडळाने घेतला आहे.

मराठी विश्‍वकोश दिनानिमित्ताने आयोजित समारंभात मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड आणि प्रगत संगणन विकास केंद्राचे (सी-डॅक) संचालक महेश कुलकर्णी यांनी नव्या योजनांची माहिती दिली.

सी-डॅक, ग्राफिक्‍स ऍण्ड इंटेलिजन्स बेस्ड स्क्रिप्ट टेक्‍नॉलॉजी (जिस्ट) यांच्या तांत्रिक सहकार्याने विश्‍वकोशाचे सर्व खंड पुढील डिसेंबरपर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या मालिकेतील डिजिटल स्वरूपातील दुसऱ्या खंडाचे प्रकाशन संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते या वेळी झाले.

कुलकर्णी म्हणाले, ""सध्या विश्‍वकोश www.marathivishwakosh.in www.marathivishwakosh.org.in य��� संकेतस्थळावर नागरिकांना मोफत पाहता येईल. प्रत्येक खंडात एक हजार पाने आहेत, अशी सुमारे वीस हजार पाने संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहेत. "गुगल'वर इंग्रजी भाषेतून शोधताना हे संकेतस्थळ "स्क्रीन'वरील यादीत प्रथम स्थानावर दिसेल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. "फॉन्ट'चा त्रास होणार नाही. त्यासाठी "युनिकोड' पद्धत वापरण्यात आली आहे. विश्‍वकोश "बोलका' व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.''

डॉ. वाड म्हणाल्या, "विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविलेल्या दीडशेहून अधिक स्त्रियांवर कन्याकोश तयार करण्यात येणार आहे. नव्या पिढीला अशा कोशाकडे आकर्षित करून घेण्याचाही आमचा प्रयत्न सुरू आहे."

साहित्याला तंत्रज्ञानाचा आधार हवा

"हल्ली ग्रंथालयात जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे विश्‍वकोशासारखे महान ग्रंथ धूळ खात पडून आहेत. अशा स्थितीत विश्‍वकोशाला संगणकीय रूप मिळाले ही निश्‍चितच आनंदाची बाब आहे. इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक भाषा लुप्त होत आहेत. हे सरकारने ओळखायला हवे. तंत्रज्ञानाचा आधार असेल तरच भाषा, साहित्य काळाच्या प्रवाहात टिकून राहतील," असे डॉ. भटकर यांनी सांगितले.

Top