अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घटनास्थळी लवकर पोचण्यास
Sakal
January 31, 2012
(Content in Marathi)
"अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे घटना समजून तेथे पोचण्याचा पोलिसांचा कालावधी 20 मिनिटांवरून सहा मिनिटांपर्यंत कमी करण्यात यश आले आहे,'' अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक आर. के. सहाय यांनी शनिवारी येथे दिली.
"इंडियन सोसायटी ऑफ जिओमॅटिक्स', "इंडियन वॉटर रिसोर्स सोसायटी-पुणे सेंटर' (आयडब्ल्यूआरएस), "सी-डॅक' आणि "सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ जिओइन्फॉरमेशन' यांच्यातर्फे "न्यू ट्रेड्स इन जीआयएस विथ स्पेशल रेफरन्स टी मोबाईल जीआयएस' या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्राचे उद्घाटन सहाय यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी के. के. व्ही. खानझोडे, वनअधिकारी डॉ. ए. के. झा आणि अभियंता सुरेश शिर्के व्यासपीठावर उपस्थित होते.
सहाय म्हणाले, ""पोलिसांनी नवीन तंत्रज्ञानाची कास धरली आहे. त्याचा प्रयोग सध्या मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा काही शहरांमध्ये करण्यात येत आहे. त्यामुळे घटनास्थळी पोचण्याचा कालावधी सहा मिनिटांपर्यंत कमी करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे हा प्रयोग औरंगाबाद आणि नाशिकमध्येही करण्यात येत आहे.''
झा म्हणाले, ""वन जमिनींवरील अतिक्रमण रोखण्यासाठी "जीआयएस'चा प्रभावी वापर करण्यात आल�� आहे. त्यामुळे जंगलावरील अतिक्रमणे रोखून जंगले सुरक्षित ठेवण्यासाठी मदत होत आहे. तसेच, वन्य प्राण्यांचा अभ्यास करण्यासही हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे.'' प्रस्तावित खानझोडे यांनी केले. शिर्के यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले.